जागतिक बाजारातील महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली (Stock Market)बाजारात प्रचंड चढउतार.

 जागतिक बाजारातील महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली (Stock Market)बाजारात प्रचंड चढउतार.

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारावर जागतिक संकेत,Japan आणि China मध्ये  आर्थिक पॅकेज जाहीर होणार असल्याच्या चर्चा,European Central Bank (ECB) ची बैठक व weekly expiry या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.
आय.टी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराने दिला सकारात्मक बंद Markets end on a positive note led by the IT and Realty stocks.
सोमवारी जागतिक बाजारात संमिश्र संकेत होते. भारतीय बाजाराची सुरुवात विक्रमाने झाली बाजार उघडताच निफ्टीने १७,४०० चा टप्पा ओलांडला.बाजारात विक्रमी तेजी बघावयास मिळाली.मिडकॅप शेअर्स मध्ये चांगलीच तेजी होती. जागतिक बाजारातील चांगले संकेत,IT आणि realty क्षेत्रामधून मिळालेला मजबूत आधार,अमेरिकेतील कमजोर जॉब डेटा व त्यामुळे Fed Reserve लगेच कठीण पाऊले उचलणार नाही हा विश्वास, तसेच Japan आणि  China मध्ये अजून आर्थिक पॅकेज जाहीर होणार असल्याच्या चर्चा यामुळे बाजारात तेजीचे वातावरण पसरले. दिवसभरातील कामकाजातWipro, HCL Technologies, Infosys, Reliance Industriesआणि Hindalco Industries ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व IOC, IndusInd Bank, ONGC, Britannia Industries आणि Kotak Mahindra Bank ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १६६ अंकांनी वधारून ५८२९६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५४ अंकांनी वधारून १७३७७ चा बंद दिला.
Dr. Reddy’s Signed Agreement With Citius Pharma To Sell Anti-Cancer Drug.  RIL arm buys majority stake in Strand Life Sciences for Rs 393 crore.
 
सेन्सेक्स व निफ्टीची तीन दिवसांची विजयाची मालिका खंडित Sensex, Nifty Snap Three-Day Winning Streak.
मंगळवारी जागतिक बाजारात संमिश्र संकेत होते. अमेरिकन बाजार सोमवारी लेबर डे निमित्त बंद होते. देशात कोरोना लसीकरणाची (VACCINATION) गती वाढली. बाजाराची सुरुवात हलक्या तेजीने झाली, परंतु सेन्सेक्स लगेच थोडा घसरला. दिवसभरात बाजारात चढउतार (volatility ) होता.बाजार बंद होताना सपाट बंद झाला . सेन्सेक्स १७ अंकांनी घसरून ५८२७९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५ अंकांनी घसरून १७३६२ चा बंद दिला. Markets end marginally lower amid volatility after hitting record levels intraday.
L&T secures order for its water & effluent treatment business
युरोपियन सेंट्रल बँकेच्या बैठकी आधी बाजाराचा सावध पवित्रा. Market ends flat a day ahead of ECB meeting.
कमजोर जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली. बाजाराने एका विशिष्ट पातळीभोवती कामकाज केले.  European Central Bank (ECB) ची बैठक व weekly expiry च्या अगोदर बाजार थोडा सावध होता. private बँकांच्या समभागात तेजी होती खास करून Kotak Mahindra Bank, HDFC Bank, ICICI Bank आणी  Axis Bank. बाजार बंद होताना सेन्सेक्स २९ अंकांनी घसरून  ५८२५० या स्तरावर बंद झाला व निफ्टी ९ अंकांनी घसरून१७३५३ चा बंद दिला.
Cabinet approves Rs 10,683 cr PLI scheme for textile sector. वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्राला उत्पादनावर आधारित अनुदान देण्याचा  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णय.
बाजार सपाट परंतु सकारात्मक बंद. Market ends flat with positive bias
विदेशी भांडवली बाजारातील कमजोर संकेतांमुळे गुरुवारी भारतीय बाजाराची सुरुवात देखील नरमाईने झाली.विकली एक्सपायरी,जागतिक बाजारातील कमजोरी,विक्रमी स्तरावरून नफावसुली व European Central Bank (ECB) ची होणारी बैठक यामुळे बाजारात दिवसभरात चढउतार होता.. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५४ अंकांनी वधारून  ५८३०५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५ अंकांनी वधारून १७३६९ चा बंद दिला.
अर्थ मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ चा  मासिक आर्थिक अहवाल जारी केला व  येणाऱ्या ३ तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली. The Monthly Economic Review for August 2021 released by the Department of Economic Affairs (DEA) on Thursday said that sanguine economic prospects continue to be catalyzed by effervescent external sector indicators.
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com  
ML/KA/PGB
11 Sep 2021
 
 

mmc

Related post