मागील आठवड्यातील घसरण रोखण्यात बाजाराला (Stock Market)यश
मुंबई, दि. २८ (जितेश सावंत ) : मागील आठवड्यात इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, मध्यपूर्वेतील तणावामुळे आशियाई तसेच अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे बाजार सुमारे 1.6% घसरला होता. गुंतवणूकदारानी बाजारातून पैसे काढण्याच्या सपाटा लावला होता. त्यातच युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली त्याच्याही फटका बाजाराला बसला.
भारत-मॉरिशस कर करार
कर सवलतींचा गैरवापर आणि चोरी टाळण्यासाठी भारताने मॉरिशससोबत दुहेरी कर टाळण्याच्या करारात (DTAA) सुधारणा केली . या करारामध्ये ‘प्रिन्सिपल पर्पज टेस्ट (PPT)’ नावाचे कलम जोडण्यात आले. मॉरिशसच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या एफपीआयला यामुळे धक्का बसला याचाही फटका बाजाराला बसला.
परंतु बाजाराला एक दिलासा मिळाला तो म्हणजे मान्सूनचा, यंदा मान्सून मनसोक्त बसरणार आहे. संपूर्ण देशांत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त असणार असल्याचे म्हटले आहे. मान्सून दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त केला गेला, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम बाजारावर होताना दिसला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आणि याच दरम्यान FII ने 20,000 कोटी रुपये काढून घेतले याचाही परिणाम बाजारावर जाणवला.
परंतु या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील सर्व तोटा पुसून टाकला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट,मध्यपूर्वेतील संघर्षाच्या तीव्रतेत झालेली कमी,यामुळे बाजार वधारला परंतु शेवटच्या दिवशी अमेरिकेची मंद आर्थिक वाढ, महागाईत झालेली वाढ ,भारतीय कंपन्यांचे संमिश्र निकाल यामुळे बाजारात नफावसुली होताना दिसली. This week, the market recovered all previous week’s losses due to declining crude oil prices and de-escalation of Middle East conflict. However, the last day saw profit-taking due to sluggish US economy, rising inflation, and mixed Indian company results.बाजारासाठी रुपयातील घसरण ही एक चिंतेची बाब आहे. A decline in the value of the rupee is causing worry among investors.
पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने सार्वत्रिक निवडणुका तसेच जागतिक घडामोडी तसेच कच्च्या तेलाच्या किमती याकडे राहील.दिनांक 1 मे रोजी बाजार बंद राहील.
बाजारात सध्या मोठया प्रमाणात अस्थिरता असल्याने गुंतवणूकदारानी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. या अस्थिरतेचा लाभ घेऊन दीर्घकाळाकरिता गुंतवणूक केली पाहिजे.
Technical view on nifty
शुक्रवारी निफ्टीने 22420 चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 22368-22349-22305 हे महत्वाचे सपोर्ट (Support)
आहेत हे तोडल्यास निफ्टी 22290-22240-22212-22183-22126- 22096.8-
22040-20023-21962-21926-21812-21797-21740.80-21697-21640-21598-21576.05-21547-21517-21500 हे स्तर गाठेल. .वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 22389-22440-22462-22475-22517-22536-22600-22687-22719-22800-22859 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.
(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ आहेत.)
jiteshsawant33@gmail.com
JS/ML/ML
28 April 2024