कर्ज मर्यादा विधेयक मंजूर झाल्याने बाजारात (Stock Market) तेजी

 कर्ज मर्यादा विधेयक मंजूर झाल्याने बाजारात (Stock Market) तेजी

मुंबई, दि. 2 (जितेश सावंत):  गेला संपूर्ण आठवडा बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरताना दिसला.मोठ्या घटनांनी भरलेल्या आठवड्यात बाजाराने सपाट बंद दिला.अपेक्षेपेक्षा चांगला GDP डेटा,31 महिन्यांच्या उच्चांकावर असलेली फॅक्टरी ऍक्टिव्हिटी,ऑटो विक्रीत झालेली सुधारणा,GST संकलनात झालेली वाढ,यूएस हाऊसने डीफॉल्ट टाळण्यासाठी मंजूर केलेले कर्ज मर्यादा विधेयक अश्या बाजाराला पोषक घटना घडून देखील बाजार एका मर्यादेतच राहिला.

शुक्रवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाला. चांगल्या जॉब डेटामुळे नॅस्डॅक इंडेक्स 13 महिन्यांच्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचला. DowJones सुमारे 700 अंकांनी आणि Nasdaq 140 अंकांच्या वाढीसह बंद झाले. युरोपीय बाजारातही तेजी दिसून आली.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 8 जून च्या रेट डिसिजन कडे असेल The MPC will hold its bi-monthly deliberations on June 6-8, 2023.
Technical view on nifty-.

शुक्रवारी निफ्टीने 18534चा बंद भाव दिला. 18573-18609 हे टप्पे पार करणे आवश्यक आहे.
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे वरच्या स्तरावर निफ्टीने 18652चा टप्पा गाठला.हा टप्पा पुन्हा तोडल्यास निफ्टी 18696-18719-18728-18752-18782 हे स्तर गाठू शकेल.

निफ्टीसाठी 18487-18464-हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 18432-18419-18392-18362-18348-18324 हे स्तर गाठेल. शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 345 अंकांनी वधारला
अमेरिकेत कर्ज मर्यादेच्या मुद्द्यावर झालेल्या सहमतीमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. मार्केटने गेल्या आठवड्यातील तेजी कायम ठेवत आणि सलग तिसऱ्या सत्रात उच्चांक गाठला.

दिवसभरात निफ्टी बँक निर्देशांकाने 44,483.35 या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. बाजाराने संपूर्ण सत्रात आपली सकारात्मकता कायम ठेवली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 344.69 अंकांनी वधारून 62,846.38 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 99.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,598.70 चा बंद दिला. Market extends gain, Sensex up 345 points
सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी
मंगळवारी बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली, परंतु बाजार सलग चवथ्या दिवशी बढत घेऊन बंद होण्यात यशस्वी झाला.

बाजार एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत राहिला. परंतु सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी)Gross Domestic Product (GDP) डेटा घोषणेच्या एक दिवस अगोदर, शेवटच्या तासांच्या खरेदीमुळे निर्देशांकाला दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ सत्र बंद करण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स122.75 अंकांनी वधारून 62,969.13 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 35.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,633.80 चा बंद दिला. Sensex extends rally to 4th day
चार दिवसांच्या तेजीला ब्रेक
बुधवारी कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत निर्देशांक नकारात्मक नोटवर उघडले आणि दिवस पुढे जात असताना तोटा वाढवत गेले.

निफ्टीने 18,500 च्या खालच्या स्तर गाठला. परंतु रियल्टी, हेल्थकेअर आणि माहिती तंत्रज्ञान शेअर्समधील खरेदीमुळे इंट्राडे मधील तोटा काहीसा कमी होण्यात मदत झाली.पण बाजाराच्या चार दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 346.89 अंकांनी घसरून 62,622.24 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 99.40 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,534.40चा बंद दिला. Market snaps 4-day run
बुधवारी संध्याकाळी केंद्र सरकारने जानेवारी-मार्च २०२३ तिमाहीचे GDP आकडे जाहीर केले देशाचा विकासदर मार्च तिमाहीत ६.१ टक्क्यांनी वाढला.

शेवटच्या तासातील विक्रीने बाजारात घसरण
संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर निर्देशांक सपाट उघडले आणि फ्लॅट राहिले परंतु शेवटच्या तासांच्या विक्रीने निर्देशांकांना दिवसाच्या नीचांकी पातळीवर ओढले.आश्चर्यचकित करणारेGDP आकडे, 31 महिन्यांच्या उच्चांकावर असलेली फॅक्टरी ऍक्टिव्हिटी,ऑटो विक्रीत झालेली सुधारणा एवढे असून सुद्धा गुरुवारी बाजारात घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स193.70अंकांनी घसरून 62,428.54 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 46.60 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,487.80 चा बंद दिला. Last-hour selling drags market.

बाजार तेजीसह बंद झाले .
यूएस हाऊसने डीफॉल्ट टाळण्यासाठी कर्ज मर्यादा विधेयक मंजूर केल्यानंतर गुरुवारी यूएस स्टॉकमध्ये वाढ झाली.तसेच यूएस फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदर वाढ थांबवेल या वाढत्या आशेने वॉलस्ट्रीटवरील रॅलीनंतर शुक्रवारी आशियाई बाजारात सकारात्मकता पाहावयास मिळाली,भारतीय बाजारात देखील तेजी पाहावयास मिळाली.अत्यंत अस्थिर सत्रात भारतीय बाजाराने दोन दिवसांची घसरण मोडून मध्यम वाढीसह बंद दिला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 118.57 अंकांनी वधारून 62,547.11 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 46.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,534.10 चा बंद दिला.

(लेखकशेअरबाजारतज्ञ,
तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
2 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *