डिंकाचा डंका! ‘उमेद’ मुळे डिंक उद्योगाला उभारी

 डिंकाचा डंका! ‘उमेद’ मुळे डिंक उद्योगाला उभारी

वाशिम, दि. २६ ( राम धनगर) : जंगल आणि शेतशिवारात फिरून डिंक गोळा करायचा , तो व्यापाऱ्यांना कमी भावात विकायचा; परंतु ‘उमेद’च्या लाभलेल्या साथीमुळे वाशीम जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात वसलेल्या पुस नदीच्या पात्रालगत चोहू बाजूंनी विस्तीर्ण जंगलानी वेढलेल्या गोस्ता या गावातील गजानन महाराज स्वयंसहायता महिला समूहच्या महिलांनी जंगलातील धावंडा प्रजातीच्या झाडाचा डिंक गोळा करून त्याचे पॅकिंग करून विक्री सुरू करून उद्योगाला उभारी दिली आहे.

‘उमेद’ने या समूहाला योग्य मार्गदर्शन केल्याने या उद्योगाने आता उभारी घेतली असून, या डिंकाची मुंबई, पुणे येथे विक्री केली जात आहे. त्यामुळे या समूहाचे नाव राज्यभर गाजले आहे. या समूहाची स्थापना २०१४ मध्ये झाली. वाशीमच्या मानोरा तालुक्यात जंगलाचा भाग जास्त असल्यामुळे आणि हाताला काम नसल्यामुळे गावातील महिला या व्यवसायाकडे वळल्या. गोस्ता या गावात उमेद मार्फत स्थापिलेले २० अधिक समुह असून या समूहाअंतर्गत शेकडो महिला महिला डिंक व्यवसायात गुंतल्या आहेत.
जंगलातून डिंक गोळा करणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय असून पुस नदी पात्रात असलेल्या विस्तीर्ण जंगलात धावंडा प्रजातीचे हजारो वृक्ष आढळतात.

धावंडा डिंक गोळा करून व्यापाऱ्याला १०० ते १५० रुपये किलोने विक्री केल्या जात होता. मात्र उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून अभियानाचे अधिकारी तालुका प्रमुख पवन आडे यांनी गावातील महिलांना संघटीत करून त्यांना उमेद अभियाना सोबत जोडले.

जंगलातून संकलीत केलेल्या या रान डिंकाला योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी पॅकिंग, बॅण्डिंग आणि लेबलिंग करून विक्री करण्याविषयी आडे यांनी मार्गदर्शन केले. व्हिओ: २०२१-२२ मध्ये या समूहाला मानव विकास कार्यक्रमामधून १ लाख ५६ हजार रुपये मंजूर झाले. त्यामध्ये या समूहाने १० टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याला तसेच ९० टक्के सबसिडी मिळाली. मिळालेल्या निधीमधून समूहाने ड्रायर, वजन काटा, पॅकिंग मशीन खरेदी केली आणि उरलेल्या पैशांमधून गावातील इतर समूहांतील महिलांकडून डिंक खरेदी करणे सुरू केले.

सन २०२३ ते २०२५ मध्ये आम्ही समूहाकडून २५० रु. प्रति किलो प्रमाणे ७ क्विंटल ५० किलो माल १,८७,००० रू. खरेदी केला , तो ड्रायरमध्ये वाळवणी करून ग्रेडींग करून तोच माल आम्ही ३९० रु. प्रती किलो प्रमाणे २,७३,००० रु. ला व्यापा-याला विक्री केली. त्यामधुन आम्हाला ८५५०० रु. नफा मिळाला. त्याच बरोबर प्रथम ५० किलोचे पॅकिंग करून मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनी, नागपूर येथील प्रदर्शनीमध्ये तथा मागणी प्रमाणे विक्री करणे सुरु आहे. आमचे गाव वाशीम जिल्हयातील शेवटच्या टोकावर असून चहुबाजुनी डोंगरदरीचा भाग असुन पुस नदीने वेढलेले आहे. कामाच्या शोधात असणाऱ्या गरजू महिलांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य केल्यामुळे आज व्यवसायाला उभारी मिळाली असल्याचे गजानन महाराज बचत गटाच्या प्रमुख किरण ढगे सांगतात.

ML/ML/SL

26 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *