नववर्ष स्वागतानिमित्त या राज्यात झाली सर्वाधिक मद्य विक्री

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना जल्लोश, पार्टी आणि डान्स सोबतच मद्यपान करण हे आता सार्वत्रिकच झाले आहे. यातून मोठा महसूल जमा होते हे लक्षात घेऊन सरकारही आता रात्रभर नववर्ष स्वागत पार्टी करण्यास परवानगी देते. सरत्या २०२४ ला निरोप देताना देशभर मोठ्या प्रमाणात मद्यविक्री झाली असून देशात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक मद्यनिक्री झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६०० कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली. तर दिल्ली-एनसीआरमध्ये 400 कोटींची दारू विकली गेली आहे. एकट्या नोएडा शहरामध्ये दोन दिवसांत १६ कोटी रुपयांची दारू विकली गेली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात विक्री झाली आहे. याशिवाय कर्नाटकात 308 कोटींची दारू विकली गेली आहे, तर तेलंगणातील जनता कोणत्याही बाबतीत मागे राहिली नाही, येथील लोकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला 402 कोटी रुपयांची दारूची विक्री झाली आहे.
केरळमध्ये १०८ कोटी रुपयांची दारू विकली गेली आहे. ऑनलाइन ॲप्सवर तर दारू सोबत आलू भुजिया, चिप्स आणि बर्फाचे तुकडे सर्वाधिक विकले गेले आहेत. उत्तराखंडमध्येही नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले. यावर्षी मद्यपान करणाऱ्या लोकांसाठी सुमारे १५ कोटी रुपयांची दारूची विक्री झाली. अशातच डेहराडून आणि नैनीतालसारख्या पर्यटनस्थळांवर सर्वाधिक दारू विकली जाते. उत्तराखंडमध्ये एका दिवसासाठी दारू विक्रीचे एकूण ६०० परवाने देण्यात आले, त्यात ३७ हजारांहून अधिक इंग्रजी दारूची विक्री झाली.
SL/ML/SL
4 Jan. 2025