राज्याने ओलांडला स्वच्छता इष्टांक ….

 राज्याने ओलांडला स्वच्छता इष्टांक ….

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने एक तारीख एक तास या मोहिमेचा आज शुभारंभ केला. महाराष्ट्रासाठी शहरी भागात 13 हजार 324 ठिकाणी कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र राज्यात त्यापेक्षा जास्त म्हणजे 14 हजार 500 ठिकाणी हा उपक्रम पार पडला.

ग्रामीण भागात 58 हजार 247 ठिकाणी स्वच्छतेचा हा उपक्रम पार पडला. अशा रीतीने महाराष्ट्रात आज हजारो नागरिकांच्या सहभागणे 72 हजार 747 ठिकाणी स्वच्छता मोहीम पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल नगर विकास विभाग त्याचप्रमाणे ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका या सर्वांचे कौतुक केले आहे. ही स्वच्छता मोहीम केवळ एक दिवसापूर्ती न ठेवता दररोज आपापली गावे, शहरे स्वच्छ राहतील हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. The state has crossed the cleanliness target…

ML/KA/PGB
1 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *