आर्यन खानला क्लिन चिट देणारी विशेष चौकशी समितीच बेकायदा

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्यन खानला क्लीन चिट देणाऱ्या आणि समीर वानखेडे IRS विरुद्ध बनावट FIR दाखल करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंग DDG, NCB यांच्या अध्यक्षतेखालील स्पेशल इनक्वायरी टिमला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण CAT, नवी दिल्ली यांनी बेकायदेशीर आणि चुकीचे घोषित केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील तपाससुत्रे हलवणाऱ्या आणि बॉलिवुडमध्ये होणाऱ्या ड्रगच्या व्यसना विषयी संशायाचे धुके निर्माण करणाऱ्या या प्रकरणाला आता वेगळे वळण लागणार आहे.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारे मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्ञानेश्वर सिंह यांनी छळ केल्याची तक्रार वानखेडे यांनी होती. याप्रकरणी वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती. आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांनी 7-8 अधिकाऱ्यांवर अनियमितता केल्याचा आरोप केला होता. यादरम्यान समीर वानखेडे यांच्यावर आरोपही करण्यात आले. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सोडण्यासाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांचा सौदा केल्याचा त्यांचा दावा होता.
SL/KA/SL
5 Sept. 2023