सोनवणे कुटुंबाला लागले ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे वेध
उल्हासनगर दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगरमध्ये राहणारे सोनवणे कुटुंब हे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचे जिवंत उदाहरण असुन आई ब्लॅक बेल्ट कराटे चॅंपियन तर त्यांची दोन्ही मुले ही वेट लिफ्टींग मध्ये तरबेज असुन त्यांचा आता ऑलिंपिक मध्ये खेळण्याचे वेध लागले आहेत.
उल्हासनगर मध्ये सोनवणे कुटूंब राहत असुन त्यांच्या दोन मुलानी महाराष्ट्र सरकार, क्रीडा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य मुंबई स्तर, ठाणे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंगमध्ये डझनभर पदके व प्रमाणपत्रे मिळवून उल्हासनगर शहराचा नावलौकिक मिळवला आहे. १६ वर्षीय मुलगी नील ईश्वर सोनवणे आणि तिचा भाऊ १५ वर्षीय कबीर ईश्वर सोनवणे यांचे स्वप्न आता देशासाठी खेळायचे आहे. तसेच त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घ्यायचा असुन त्यांना शहरातील नागरिकाकडुन सहकाऱ्याची अपेक्षा आहे .
विशेष बाब म्हणजे त्याची ३५ वर्षीय आई कमल ईश्वर सोनवणे याही ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आणि योगगुरू आहेत . मुलींच्या सुरक्षेसाठी आणि खेळासाठी समर्पित असलेले हे उल्हासनगर रहिवासी कुटुंब ऑलिम्पिक खेळाशी संबंधित त्यांच्या आगामी उपक्रमांसाठी आणि देशासाठी खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाकडून सहकार्याची अपेक्षा करत असुन खरोखर समाजातील नागरिकानी या कुटूंबाला सहकार्य करणे गरजेचे आहे .