या दिवसापासून सुरु होतोय रौप्यमहोत्सव काला घोडा फेस्टिव्हल
मुंबई,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील प्रसिद्ध काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हल आता रौप्यमहोत्सवासाठी सज्ज झाला आहे. रौप्यमहोत्सवी काला घोडा फेस्टिव्हल यंदा २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. त्यानिमित्त २० हून अधिक ठिकाणी ३०० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
१९९९ साली काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हलची सुरुवात झाली. यंदा या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा विशेष कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमात २५ वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचे सादरीकरण ५५ पेक्षा अधिक कलाकार आणि संस्थांद्वारे होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा आदर करणारा ‘अवघा आनंदी आनंद’ हा कार्यक्रम देखील सादर केला जाईल.
SL/ML/SL
21 Jan. 2025