नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’, ‘घर बंदूक बिरयाणी’ आणि ‘नाळ २’चित्रपटाच्या यशानंतर आता नागराज मंजुळे प्रेक्षकांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे खाशाबा. काही महिन्यांपूर्वी नागराज मंजुळेने या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट भारताचे दिवंगत कुस्तीपटू खशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली आहे.
जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘खाशाबा’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नागराज मंजुळेंनीच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याची माहिती दिली.
‘खाशाबा’ या चित्रपटात भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक विजेत्या खाशाबा जाधव यांची न ऐकलेली कहाणी पहायला मिळणार आहे. नागराज मंजुळेने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर खाशाबाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याचा फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने ‘चांगभलं’ असं कॅप्शन दिले आहे.
SL/KA/SL
1 Dec. 2023