शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारही नाही
सांगली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने,ज्या पद्धतीने निकाल दिला आहे,ते पाहता शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नसून,हे सरकार बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालंय,असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
त्याच बरोबर हे सगळे अवैध असून भाजपाने महाराष्ट्रात केलेली कृती,कशी चुकीचे आणि घटनेची पायमल्ली करणारी आहे,हे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे,ते सांगली मध्ये बोलत होते.
सत्ता कोणाची आणि मुख्यमंत्री कोण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने महत्त्व नाही,सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने फटकारले ते पाहता शिंदे सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत नैतिकते बाबत बोलणं त्यांच्यावर जास्त अन्याय करणारे होईल,
तसेच आमदार अपात्र बाबतीत विधानसभा अध्यक्षांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने जे मुद्दे नमूद केले आहेत,त्या चौकटीत राहून लवकर निर्णय घ्यायला पाहिजे.असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारांवरही जयंत पाटलांनी टीका करत भेटणाऱ्या माणसाला,त्या माणसांप्रमाणे मार्गदर्शन करायचे.आणि 24 तास त्यांचे एकच काम सुरू होते,त्यामुळे संधी मिळेल त्यावेळी आमचे सरकार घालण्यात त्यांनी फार मोठा हातभार लावला,असा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.
सरकार वाचलं हे सत्तेच्या भोवती गोळ्या झालेल्यांच्यासाठी क्षणिक आनंद आहे,आणि हे सर्व अवैध असून भाजपाने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीचे आणि घटनेची पायमल्ली करणारी आहे,हे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिल्याचे भावनाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
ML/KA/SL
11 May 2023