मराठवाड्याचे पाणी मराठवाड्यालाच अशी सरकारची भूमिका

नागपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाचा उर्ध्व भागातील धरणातून मराठवाडयातील छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्हयातील शहरांना तसेच गावांना पाणी सोडण्यात येत असून मराठवाड्याचे पाणी मराठवाड्यालाच द्यावे लागेल अशी ठाम भूमिका राज्य सरकारची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
या संदर्भात तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाबा जानी दुरांनी, सुरेश धस यांनी सभागृहात मांडला होता. हातवण बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाला गती देण्यात येत असून मौजा हातवण येथील 204.17 हेक्टर आणि मौजा बापफळ शिवारातील 118 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर सुरू असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
19 Dec. 2023