प्रजासत्ताक दिनाच्या विशेष परेडमध्ये रोबोट आर्मीने दिली सलामी

 प्रजासत्ताक दिनाच्या विशेष परेडमध्ये रोबोट आर्मीने दिली सलामी

कोलकाता, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोलकातामध्ये एक खास परेड पाहायला मिळाली, ज्यामध्ये रोबोट आर्मीने सलामी दिली. भारतीय लष्कराने रोबोटिक डॉग्सचे प्रदर्शन केले.पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी कोलकाता येथील रेड रोड येथे तिरंगा फडकवला. यानंतर नायब सुभेदार रजनीश यांच्या नेतृत्वाखाली परेड झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.भारतीय लष्कराने नॉर्थ टेक सिम्पोजियम 2023 मध्ये हे रोबोट लाँच केले होते. संजय मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट (MULE) असे त्यांचे नाव आहे. हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले आहेत.

लष्कराने आपल्या अनेक युनिट्समध्ये 100 रोबोटिक डॉग्सचा समावेश केला आहे.ते उणे 40 अंश तापमानातही काम करू शकतात. त्यांचे वजन सुमारे 15 किलो आहे आणि ते 10 किलोमीटरपर्यंत चालू शकतात. हे रिमोट कंट्रोलने चालवले जातात. ते नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि आवश्यकतेनुसार प्रतिसाद देऊ शकतात.

भारतीय लष्कराने 15 जानेवारी रोजी पुणे, महाराष्ट्र येथे 77 वा लष्कर दिन साजरा केला. परेडमध्ये विविध रेजिमेंट केंद्रातील 8 मार्चिंग तुकड्यांनी मार्चपास्ट केला. यामध्ये लष्कराने प्रथमच 12 रोबोटिक डॉग्स प्रदर्शित केले होते.

SL/ ML/ SL

26 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *