काटेपूर्णा नदीचे पात्र पडले कोरडे; शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता.

वाशिम, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील काटा या गावातून उगम होणारी आणि जिल्ह्याची प्राणहिता म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच कोरडे पडले आहे. पैनगंगा नदीची उपनदी असणारी काटेपूर्णा नदी ही वाशीम आणि अकोला जिल्ह्यातून वाहते.
दोन्हीही जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र हे काटेपूर्णा नदीमुळे सिंचनाखाली आले असून मागील काही वर्षांपासून काटेपूर्णा नदीचे पात्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरडे पडत असल्याने नदी पात्रातील गावातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. नदी पात्र कोरडे पडल्याने परिसरातील अनेक नैसर्गिक तसेच कृत्रिम जलस्त्रोत्रातील पाणी पातळी घटल्याने आगामी उन्हाळ्यात मानवासह वन्यप्राण्यांनाही जल दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागणार आहे.
SL/ML/SL
18 Feb. 2025