देशात कोरोनाचा धोका वाढला, सापडले नव्या व्हेरिएंटचे २१ रुग्ण

 देशात कोरोनाचा धोका वाढला, सापडले नव्या व्हेरिएंटचे २१ रुग्ण

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात दिवसागणित कोरोनाचा धोका वाढत असून केंद्र सरकारने राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाच दिवशी तब्बल 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील 27, ठाण्यातील 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्णाचा समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन २१ रुग्ण आढळले आहेत.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना आधीपासूनच गंभीर आजार होते.

SL/KA/SL

20 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *