12 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फ प्रजातीचे पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा यशस्वी प्रयोग!

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक यश मिळवलं आहे. अंदाजे १२,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या ‘डायर वुल्फ’ या लुप्त प्रजातीचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पडला आहे. ‘रेसस’ आणि ‘रोझफील्ड’ यांसारख्या आधुनिक प्रजातींच्या DNA चा अभ्यास करून ‘डी-एक्स्टिंक्शन’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हे डायर वुल्फचे पुनरुज्जीवन हे डी-एक्स्टिंक्शनमधील यशस्वी प्रयोगाचे पहिलं उदाहरण मानलं जात आहे.
या घडामोडीमुळे वैज्ञानिक समुदायात उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे. या प्रयोगामुळे भविष्यात अन्य नामशेष प्रजाती पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.