परतीच्या पावसाने घातला धुमाकूळ

कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शिये परिसरात काल सायंकाळी ढगफुटीसदृश पावसानं रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतें.लोकांच्या घरात आणि स्टेट बँकेत पाणी शिरल्यानं प्रापंचिक आणि इतर साहित्याचं तसंच काही पिकांचं मोठं नुकसान झालं.
कोल्हापूर शहरासह उपनगरालाही परतीच्या पावसानं काही काळ अक्षरश: झोडपून काढलं.
शिये ग्रामपंचायत परिसर हा
सखल भागात आहे.
गावच्या उत्तर दिशेनं डोंगर भागातून येणारं पाणी हे
ओढ्यातून पुढे जाते.
जोरदार पावसामुळे पाणी ओढ्यातून पुढे न जाता ते
रस्त्यावरून वाहत लोकांच्या घरात शिरलं. शिये परिसरात परिसरात रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. आज पासून कोल्हापूर जिल्ह्यात
मध्यम ते तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेली दोन दिवस पावसानं उसंत
घेतली होती. अंग करपणारं ऊन लागत असल्यानं नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. मात्र या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. The return rains made a mess
ML/KA/PGB
5 Oct 2023