कर्नाटकचा निकाल हा भारत जोडो यात्रेचा परिमाण

 कर्नाटकचा निकाल हा भारत जोडो यात्रेचा परिमाण

ठाणे दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाल्याने कॉग्रेस विजयी मिळाला. त्यामुळे कर्नाटक मधील भाजपचा पराभव हा स्वभावाचा आणि त्यांच्या वागणुकीचा पराभव असल्याचा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन बांधणीसाठी ठाणे जिल्ह्यातील मनसैनिकांचे मेळावे घेऊन त्यांचे मत जाऊन घेत आहे. आज ठाणे जिल्हयातील दौऱ्याचा तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी अंबरनाथ मध्ये संवाद साधला .यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणुकीत कॉग्रेसला मिळलेल्या विजयानंतर भाजपवर टीका केली.

सत्ताधारी हा हरत असतो…

राज ठाकरे पुढे म्हणाले कि, आपलं कोण वाकडे करू शकतो असा जो विचार असतो त्याचा हा पराभव असल्याचे सांगत भाजप नेत्यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. शिवाय कर्नाटक निवडणुकीचा निकाल पाहता जनतेला लोकांना कधी गृहीत धरू नये याचा सर्वांनीच बोध घेण्यासारखा आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा असेही सांगत विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हा हरत असतो असेही त्यांनी सांगितले .

मनसेत यापुढे गटबाजी दिसणार नाही..

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागसह उल्हासनगर , अंबरनाथ, बदलापूर या भागातील मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे त्याचा फटका मनसेला निवडणुकीत बसत आहे. या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की यापुढे मनसेत गटबाजी दिसणार नाही. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधकांची मोट बांधली आहे. त्यामध्ये आगामी काळात मनसेची साथ मिळाले का ? असा प्रश्न पत्रकाराने विचारताच त्या प्रश्नाला हसून त्यावर बोलणं टाळले आहे.

जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन

राज ठाकरे यांचा शुक्रवारपासून ठाणे आणि पालघर जिल्हा दौरा सुरू झाला असून आज दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत राज ठाकरे हे मिरा-भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहर असा दौरा आयोजित केला. या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये आज अंबरनाथ व बदलापूर दौऱ्यावेळी मनसे पक्ष कार्यालयांचे उद्घाटन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका, पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम, पत्रकार आणि प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटीगाठी अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

या दौऱ्याच्यानिमित्ताने मनसे जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

SL/KA/SL

14 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *