उत्तरकाशी बोगद्यातून मजुरांची सुटका आणखी लांबली
उत्तरकाशी, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तराखंड येथील उत्तरकाशी टनल मध्ये मागील चौदा दिवसांपासून ४१ कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर काम केलं जात आहे. यादरम्यान कछयारी-भंगवार फोरलेन प्रोजेक्टसाठी बांधल्या जात असलेल्या ट्विन टनल मध्ये सुरक्षेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) ने अॅडव्हायजरी जारी केली आहे. The rescue of laborers from the Uttarkashi tunnel was further delayed
याअंतर्गत आता बोगद्याच्या खोदकामादरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पाईपलाइन टाकण्यात येणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचे काम करणाऱ्या कंपनीने या नव्या गाईडलाइन्सची अंमबजावणीचे काम सुरु केले आहे.मटौर ते शिमला फोरलेन प्रोजेक्ट अंतर्गत ट्विन चनलचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करत असलेल्या कंपनीने मे २०२३ मध्ये गजरहेड ते समेलाच्या पुढे बोगद्याचो दोन्ही टोके जोडण्याचे काम सुरू केले आहे. बोगद्याचे खोदकाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मजूर दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत.
आता या कामगारांना सुटकेसाठी अजून साधारण पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे.
SL/KA/ SL
25 Nov. 2023