भांडवली बाजाराची (Stock Market) विक्रमी घोडदौड सुरूच

सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधार
मुंबई, दि. 9 (जितेश सावंत) : 7 मार्च रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात भारतीय बाजाराचा तेजीचा सिलसिला सुरु राहिला.सकारात्मक जागतिक संकेतांच्या आधारे निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.सेन्सेक्सने प्रथमच 74,000 चा व निफ्टीने प्रथमच 22,500 चा टप्पा पार केला. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने भारताचे महागाईचे तसेच औद्योगिक उत्पादनाचे आकडे (Industrial production), यूएस महागाई तसेच युरो झोन औद्योगिक उत्पादनाचे आकडे(Industrial production) याकडे असेल.
Technical view on nifty-
गुरुवारी निफ्टीने 22525.7 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीने 22493.5 चा बंद भाव दिला.निफ्टी साठी 22462-22440–22419.5-22389- 22378.4-22343-22297-
2278 हे महत्वाचे सपोर्ट
(Support) आहेत हे तोडल्यास निफ्टी 22239.80-22212.7-22183.30-22126-22040.7-22018-21962 हे स्तर गाठेल.तर वरच्या स्तरावर निफ्टी साठी 22536-22578
-22631 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.
निफ्टीने नवीन उच्चांक गाठून सुद्धा बाजार किरकोळ वाढीसह बंद
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढ नोंदवली. परंतु बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आले. निफ्टीने 22,440.90 चा नवा उच्चांक गाठला सेन्सेक्स 74 हजारच्या जवळ जाताना दिसला. दिवसभरात सेन्सेक्सने 73,990.13 ची पातळी गाठली.परंतु नफावसुलीमुळे बाजार वरच्या स्तरावरून घसरला. Market closes with minor gains after Nifty hits new high
चार दिवसांच्या तेजीला ब्रेक
मंगळवारी सलग चार दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. बाजाराची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली आणि दिवस पुढे सरकताना बाजारातील विक्रीचा जोर वाढला आणि घसरण देखील वाढली. सर्वात मोठी घसरण आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये दिसून आली. परंतु दुपारनंतर झालेल्या खरेदीमुळे बाजार बंद होताना तोटा कमी होण्यास मदत झाली.Market snaps 4-day winning streak
बाजाराने गाठले नवे विक्रमी शिखर
कमकुवत सुरुवातीनंतर, बाजार बहुतेक सत्र लाल रंगातच राहिला. परंतु शेवटच्या तासातील खास करून ,बँकिंग, आयटी आणि फार्मा समभागातील जोरदार खरेदीमुळे बाजाराने नवे विक्रमी शिखर गाठले. सेन्सेक्सने प्रथमच 74,000 चा टप्पा ओलांडला.निफ्टीनेही 22,497.20 चा नवीन उच्चांक गाठला.
बाजाराचं सपाट बंद
गुरुवारी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली.बाजार तेजीत सुरू झाला.निफ्टीने प्रथमच 22,500 चा टप्पा पार केला. परंतु बाजार तेजी राखण्यात अयशस्वी ठरला. बाजारात प्रॉफिट बुकींग झालेले दिसले.मार्केटमध्ये रेंजबाउंड ट्रेड होताना दिसले व बाजार सपाट बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले.Market ends flat
(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)
The record-breaking race of the stock market continues
PGB/ML/PGB
9 March 2024