या राज्यात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक
नवी दिल्ली, दि. ३१ : देशातील राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अरुणाचल प्रदेश या राज्यात अधिक आहे. येथील जवळपास 24.2% महिला दारू पितात. दारू येथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकांची ही खास प्रथा आहे. येथे ‘अपोन्ग’ म्हणजे तांदळापासून तयार केलेली बिअर पिण्याची प्रथा आहे.
तर त्यानंतरचे राज्य हे सिक्किम आहे. या राज्यातील 16.2% महिला या दारू पितात. या राज्यात प्रत्येक घरात मद्य तयार करण्यात येते. येथे छंग (Chhaang) ही धान्यापासून तयार करण्यात येणारी दारू आहे. येथील प्रत्येक घारत बिअर तयार करण्यात येते. सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमात ही प्यायली जाते.
देशात बिहार, गुजरात आणि नागालँड ही राज्य देशात ड्राय स्टेट म्हणून ओळखली जातात. या राज्यात दारू बंदी जाहीर आहे. तर लक्षद्वीप या बेटावर ही दारु बंदी आहे. पण देशात या राज्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक मद्य सेवन करतात.
SL/ML/SL