रणवीर अलाहबादियाला ‘द रणवीर शो’ पॉडकास्ट पुन्हा सुरू करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमामुळे चांगलाच अडचणीत आलेला युट्यूबर रणवीर अलाहबादियाला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला सोशल मीडियावर त्याचं पॉडकास्ट शो अपलोड करायला परवानगी दिली आहे. समय रैनाच्या युट्यूब शोमध्ये रणवीर अलाहबादियाने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याचं पॉडकास्ट प्रसारित करणं बंद करायला सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आता रणवीरला दिलासा दिला असला तरी त्याला कार्यक्रमात आक्षेपार्ह काही प्रसारित होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत
ML/ML/PGB 3 Mar 2025