राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध

 राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध

राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज आज छाननीमध्ये बाद ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.त्यामुळे आता कोणतेही मतदान होणार नाही.

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवार म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज दाखल केला होता. सहा जागांसाठी काल सात अर्ज दाखल झाल्याने अचानक ही निवडणूक चुरशीची होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र आज छाननीच्या दिवशी जगताप यांच्या अर्जावर आवश्यक सूचक आणि अनुमोदक सदस्यांच्या सह्या नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. काल त्यांनी आपल्याला दहा आमदारांचा पाठिंबा असल्याचे माध्यमांना सांगितले होते. निवडणूक बिनविरोध झाल्याची रीतसर घोषणा अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजे येत्या २० तारखेला केली जाईल.

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

भाजप — अशोक चव्हाण,
मेधा कुलकर्णी,
डॉ अजित गोपछडे

शिवसेना(शिंदे गट) – मिलिंद देवरा
राष्ट्रवादी (अजित पवार) – प्रफुल पटेल
काँग्रेस – चंद्रकांत हांडोरे

The Rajya Sabha election was finally uncontested

ML/KA/PGB
16 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *