‘जय संतोषी माँ’ चित्रपटाच्या निर्मात्याचे निधन

 ‘जय संतोषी माँ’ चित्रपटाच्या निर्मात्याचे निधन

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा (८५) यांचे निधन झाले आहे. ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटासाठी सतराम हे विशेष ओळखले जायचे. ‘जय संतोषी माँ’ने थिएटरमध्ये असा विक्रम केला जो आजपर्यंत कोणताही चित्रपट करू शकला नाही. ‘जय संतोषी मां’चे बजेट फक्त 5 लाख रुपये होते, पण त्यावेळी जवळपास 5 कोटी रुपये कमावले होते, जे आजच्या तुलनेत 100 पट जास्त आहे. जय संतोषी माँ’ हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले, जे मोडणे आजही कठीण झाले आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘शोले’ या चित्रपटाला देखील टक्कर दिली होती. चित्रपटात माँ संतोषीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता गुहा यांची खऱ्या आयुष्यातही लोक पूजा करत.

सतराम रोहरा यांचा जन्म १६ जून १९३९ रोजी सिंध, ब्रिटिश भारतात म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये झाला. स्वातंत्र्यानंतर सतराम यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. यानंतर सतराम यांनी येथूनच आपले शिक्षण पूर्ण केले. निर्माता म्हणून सतराम रोहरा यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेरा डाकू.’ यानंतर त्याचा ‘रॉकी मेरा नाम’ हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यातूनच त्यांची कारकीर्द पुढे आली. यानंतर त्यांनी ‘जय संतोषी मां’ हा चित्रपट बनवला, जो ब्लॉकबस्टर ठरला.

याशिवाय जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे ‘नवाब साहिब’, ‘घर की लाज’, ‘करण’ आणि ‘जय काली’ असे अनेक सिनेमे सतराम यांनी केले होते. सतराम रोहरा हे निर्माते तसेच गायक होते. ‘झुलेलाल’, ‘हाल ता भाजी हालू’, ‘शाल ध्यार ना जमान’ आणि ‘लाडली’ ही गाणी त्यांनी गायली आहेत.

SL/ML/SL

20 July

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *