वर्ध्यातील बायोमेडिकल वेस्टच्या प्रश्न लवकरच सुटणार
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ध्यातील बायोमेडिकल वेस्टच्या प्रश्नावर आज बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ता पक्षाचे लक्ष वेधले त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. The problems of biomedical waste in Wardha will be solved soon
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उस्मानाबाद नगरपरिषद अंतर्गत बायोमायनिंगच्या कामातील गैरव्यवहारावर चर्चा सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वर्धा येथील बायोमेडिकल वेस्टचा प्रश्न सोडवण्याची सूचना केली.
यावेळी उपसभापतीनी सांगितले की, वर्धा येथे रुग्णालयातील मृत अर्भके आणि इतर बायो मेडिकल वेस्ट हे आठ आठ दिवस तसेच पडून असते त्यामुळे रोगराई पसरण्याचीची भीती निर्माण झाली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट दिले जाते वर्धा येथे देखील अशा प्रकारे बायो कचरा उचलण्यासाठी संबंधित यंत्रणा व व्यवस्था निर्माण करून या प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी, अशी सूचना उपसभापतींनी केली. उपसभापतींच्या निर्देशावर मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, उपसभासपतींच्या सूचनेचे पालन होईल आणि वर्धा येथे तत्काळ लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यात येईल.
ML/KA/SL
28 Dec. 2022