पंतप्रधानांनी केले चांद्रयान – ३ च्या लॅंडींग स्पॉटचे नामकरण
![पंतप्रधानांनी केले चांद्रयान – ३ च्या लॅंडींग स्पॉटचे नामकरण](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/08/Shivshakti-Point.jpg)
श्रीहरीकोटा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
ब्रिक्स परिषदेसाठी द. आफ्रिकेत गेलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज देशात परतताच इस्रोमधील चांद्रयान -३ च्या टिम मधील शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पंतप्रधानांनी यावेळी तीन महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहेत.
भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करेल.ज्या ठिकाणी लँडर चंद्रावर उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे म्हटले जाईल.ज्या ठिकाणी चांद्रयान-2 च्या पायाचे ठसे आहेत, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ असे म्हटले जाईल. अशा तिन महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी केल्या. स्पेस मिशनमध्ये टचडाऊन पॉईंटला नाव देण्याची परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान ३ उतरलं, त्या जागेचं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं, ती जागा आता शिवशक्ती पॉईंट नावानं ओळखली जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. यानंतर इस्रोच्या कार्यालयात टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मात्र कधी कधी असं वाटतं की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी अधीरता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी आणि एवढा ऑड टाइम. मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. पण मला तुम्हाला भारतात… (भावुक होत) लवकरात लवकर तुम्हाला भेटायचं होतं.’मला तुम्हाला नमन करायचे होते. तुमच्या मेहनतीला सलाम… तुमच्या संयमाला सलाम… तुमच्या जिद्दीला सलाम… तुमच्या चैतन्यला सलाम. तुमच्या आत्म्याला सलाम….चंद्राच्या ज्या भागावर टचडाउन झाले, तो बिंदू आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल, असे मोदी म्हणाले.
२०१९ मध्ये भारताचं चांद्रयान २ मिशन अपयशी ठरलं. चांद्रयान-२ अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरलं. त्याला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयश आलं. चांद्रयान-२ नं क्रॅश लँडिंग केलं. त्या ठिकाणालादेखील नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. चांद्रयान २ नं जिथे क्रॅश लँडिंग केलं, ते स्थान यापुढे तिरंगा पॉईंट म्हणून ओळखलं जाईल, अशी घोषणा मोदींनी केली.
SL/KA/SL
26 Aug 2023