अखेर मुंबईतील मेट्रो तीन प्रकल्प मार्गी , पंतप्रधानांनी केले इतर प्रकल्पांचे ही उद्घाटन
मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता करण्यात आले. ठाणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, डोंगराएवढी कामे उभी राहत असताना विरोधक रोज आरोप, शिव्याशाप देण्याशिवाय यांच्याकडे दुसरे काही नाही. आम्ही नेहमी सांगतो, तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ आणि माझ्या समोर बसलेल्या या साक्षात दुर्गा या असुरांचा नक्की संहार करतील, यात माझ्या मनात शंका नाही, अशी टीका त्यांनी केली. महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाआघाडी सरकारच्या बालहट्टामुळे मुंबई मेट्रो 3 चे काम बंद पाडले होते. त्याची चौकशी लावा म्हणाले, पण मी काही चौकशी लावली नाही, नाहीतर हा कार्यकर्मच झाला नसता. त्यांचा आग्रह होता ही विकासकामे बंद करणे, अटल सेतु, समृद्धी, कोस्टल रोड, मेट्रो, कारशेड या संगळ्यामध्ये त्यांनी स्थगिती लावली. परंतु दोन वर्षांपूर्वी आम्ही यांचा टांगा पलटी केला आणि त्यामुळेच हे प्रकल्प पुढे जात आहेत.
वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता करण्यात आले.वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन हे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम नांदेड येथे विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरद्वारे पोहरादेवी येथे दाखल झाले. पोहरादेवी येथील मॉ जगदंबा देवीच्या मंदिराला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले. संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव महाराज यांच्या समाधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले. नंगारा वास्तू संग्रहालयाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.
वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन हे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम नांदेड येथे विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरद्वारे पोहरादेवी येथे दाखल झाले. पोहरादेवी येथील मॉ जगदंबा देवीच्या मंदिराला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले. संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव महाराज यांच्या समाधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले. नंगारा वास्तू संग्रहालयाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.
SL/ML/SL
5 Oct. 2024