ट्विटरवर ब्ल्यू टीकसाठी एवढी किंमत मोजावी लागणार

 ट्विटरवर ब्ल्यू टीकसाठी एवढी किंमत मोजावी लागणार

मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोगस अकाऊंटपासून वापरकर्त्याला संरक्षण देण्यासाठी ट्विटरकडून ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. ही सुविधा सशुल्क असून यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या नवीन फिचरबद्दल आणि त्यासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ट्विटरने एक  एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ब्लु टिक संदर्भातील नव्या किंमती आणि फिचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. अँड्रॉइड आणि वेबसाठी ब्लु टिकची किंमत ८ डॉलर असेल, तर आयओएससाठी ११ डॉलर आकारले जातील.

सशुल्क सुविधेमुळे उठसुठ ट्विट करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण कमी होईल आणि वापरकर्त्यांची वैधताही सिद्ध होईल.

SL/KA/SL

12 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *