ऊसदर आंदोलन झाले हिंसक

 ऊसदर आंदोलन झाले हिंसक

कोल्हापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छेडलेल्या ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही शेतकरी
ऊस तोड करून नेत असताना संतप्त आंदोलकांनी ट्रॅक्टर, उसाच्या गाड्या पेटवल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं छेडलेलं ऊस आंदोलन पेटलं असून आता त्याला हिंसक वळण लागलं आहे. काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवून देण्यात आली आहेत. तसंच अनेक ठिकाणी ऊस तोडणी बंद पाडण्यात आली आहे आणि ऊस वाहतूक करणारी वाहनं पलटी करून देण्यात आली आहेत.

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये मिळाली पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने आज जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे ऊस आंदोलन तीव्र केला आहे.. काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवून देण्यात आले आहेत. तर सकाळपासून ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी ऊस तोडणी बंद पाडली आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने पलटी करून दिली आहेत. The price movement became violent

रात्री वारणा सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टर अज्ञात लोकांनी पेटविला. सदर घटना वठार पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ घटना घडली असून सरकार आणि कारखानदार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू लागल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कागल तालुक्यात शेतकरी आक्रमक झाला आहे
कापशी खोर्‍यातील परीसरात संताजी
घोरपडे शाहू सदासाखर बिद्री कारखान्याची ऊस वाहने रोखली. अकिवाट इथं गुरुदत्त कारखाना इथे ठिय्या मारला आहे.
कारखाना आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

ऊस आंदोलनाचा भडका उडाला असून शेतकऱ्यांना परवाडणारा दर न देता गुरुदत्त कारखाना जबरदस्तीने ऊस तोड करून नेत असताना संतप्त आंदोलकांनी उसाच्या गाड्या पेटवल्या.

ML/KA/PGB
13 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *