अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

वॉशिग्टन डीसी, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने सर्व जगभरात हाहाकार माजवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. लास वेगासमधील एका परिषदेत बोलण्यापूर्वी त्यांची कोरोवाची टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये त्यांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आलं. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी याबाबत माहिती दिली आहे..

अहवालानुसार, राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येताय. यावेळी त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते स्वत: सेल्फ-आइसोलेशनमध्ये आहेत. संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांचे आगामी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान आता हा अहवाल समोर आल्यानंतर कोरोना पुन्हा वाढतोय का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय

आरोग्याविषयी माहिती देताना, राष्ट्राध्यक्षांचे डॉ. केविन ओ’कॉनर यांनी सांगितलं की, बुधवारी दुपारी त्यांना श्वसनासंबंधीची लक्षणं दिसू लागली. यावेळी त्यांना सामान्यपणे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. बिडेन यांना सध्या कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्याच्या शरीराचं तापमान 97.8 आहे आणि पल्स ऑक्सिमीटर 97% वर सामान्य आहे. यावेळी बायडन यांना पॅक्सलोव्हिडचा डोस देण्यात आला आहे. हा डोस कोविड-19 साठी लिहून दिलेली तोंडी अँटीव्हायरल गोळी आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे वाढता धोका लक्षात घेता यू.एस. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) ने शिफारस केली आहे की 65 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दुसरी लस द्यावी. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, सीडीसीने कोविड-19 साठी अपडेटेड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यावेळी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्यांच्या शेवटच्या लसीनंतर चार महिन्यांनी बूस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

SL/ML/SL

18 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *