अग्निशमन दलातील होणाऱ्या भरतीवर ब्रेक लागण्याची शक्यता!
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेतील अग्निशमन दलातील होणाऱ्या भरतीवर ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे , पालिका प्रशासनाने उंचीवरून घातलेल्या गोंधळामुळे भाग घेण्यास इच्छुक उमेदवारांनी व संधी हुकलेल्या उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण अग्निशमन भरतीवरच ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई अग्निशमन दलातील अग्निशमन या पदावर उमेदवाराची निवड करताना शारीरिक दर्जाची तपासणी केली जाते . यामध्ये गेली कित्येक वर्षे उंची किमान १६५ से मी ही ठेवली होती . परंतु २०११ साली यात बदल करून किमान उंची १७२ से मी करण्यात आली . ही उंची ७ से मी ने वाढवण्यात आली . महाराष्ट्र राज्य अग्निसंचलनालया तर्फे अग्निशमन या पदाचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देखील किमान उंची १६५ से मी हीच अहर्ता आहे.
अग्निशमन सेवेमध्ये नोकरी मिळावी म्हणून अनेक तरुण हा अभ्यासक्रम पूर्ण करतात , परंतु मुंबई अग्निशमन दलाने विनाकारण उंचीच्या अहर्तेमुळे केलेल्या बदलामुळे राज्यशासनाच्या अग्निशासकाचा अभ्यासक्रम पूर्ण करून देखील उमेदवार मुंबई अग्निशमन दलात अग्निशामकाच्या पदासाठी पात्र ठरत नाही , राज्यशासनाच्या अग्नि संचालनालयाचे अग्निशामक या पदासाठीचे नियम हे मुंबई अग्निशमन दलालाही बंधनकारक करणे आवश्यक आहे , तरीही नगरविकास खाते किंवा राज्य अग्निशमन संचालनालय यांना न कळवता किंवा लेखी परवानगी न घेता मुंबई अग्निशमन दलाने उंचीची अहर्ता किमान १६५ से मी वरून १७२ से मी केली आहे . मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील अग्निशमन सेवेमध्ये ही अग्निशामकाच्या उंचीची अहर्ता १६५ से मी आहे .
त्यामुळे अग्निशामकाची किमान उंची १६५ वरून १७२ केल्याने मुंबईतील भरतीप्रक्रियेत उमेदवारांवर अन्याय झाला असल्याची माहिती अभय अभियान ट्रस्टच्या अध्यक्ष कविता सांगरुळकर यांनी दिली , या विषयाचे गांभीर्य आपल पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या निदर्शनास आणून दिले , मात्र त्यांनी याबाबतीत कोणतीही दखल न घेतल्याने आपण या भरती प्रक्रियेत भाग घेणारे उमेदवार व अभय अभियान ट्रस्ट यामार्फत आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती सांगरुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
SW/KA/SL
10 Jan. 2023