आम्ही केवळ दलितांपुरते मर्यादित रहावे ही काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका
अमरावती, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना उद्धव ठाकरे Shiv Sena Uddhav Thackerayव आमची युतीबाबत बोलणी झालेली आहे, आम्ही उद्धव ठाकरे यांनी घोषणा करावी म्हटलं मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत चर्चा करत असून एकत्रित घोषणा करावी अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.The position of Congress NCP
अमरावती पदवीधर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.अनिल अमलकर यांच्या प्रचारार्थ आले असता आज अमरावती येथे पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
यापूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेलं होतं आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपुरते मर्यादित राहावं अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आहे ती आम्हाला मुळीच मान्य नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी अशी बाळासाहेब आंबेडकर यांनी रोखठोक भूमिका मांडली.
शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास आमचा विरोध नाही असेही बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.नोकरीतून निवृत्त झालेल्या जेष्ठ नागरिकांना जुनी पेन्शन लागू करून त्यांची काळजी सरकारने घेतली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
ML/KA/PGB
22 Jan. 2023