राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि खेडकर प्रकरण
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागले, नवे सरकारही स्थापन झाले. आता राज्यात तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या तंबूत धामधूम सुरू झाली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या मुंबई भेटी नंतर उठलेला वादंग , छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट , भाजपची होणारी पुण्यातील बैठक हे सगळे त्याचाच भाग आहे. यातच प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्यानी प्रसिद्धी माध्यमे गाजत आहेत . या सगळ्याचा परामर्श आजच्या ‘ वर्तमान ‘ व्हिडिओ मध्ये घेतला आहे. तो पहा , लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब ही करा.