अन्यथा सरकारने सरकारचं, तर मराठे मराठयांचं धोरण ठरवतील
जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :येत्या २० तारखेपर्यत सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे.जर तुम्ही या कायद्याची अंमलबजावणी करणार नसाल तर सरकारचं धोरण सरकार ठरवेल आणि मराठे मराठ्यांचं धोरण ठरवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कायद्याची अंमल बजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या ६ दिवसांपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. काल शासनाच्या शिष्ट मंडळाने येऊन त्यांना अन्न पाणी तसेच उपचार करण्याची विनंती केली होती.तर पहाटे सकाळी मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे यांनीही जारांगेची समजावणी केली पण जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.आजही घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याच विषयावर भाष्य केले. हे सगळे २० तारखे पर्यंत झाले पाहिजे असही त्यानी ठामपणे सांगितले. सरकार २० तारखेपर्यंत मराठा आरक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचललेल असा विश्वासही त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.
ML/KA/PGB
16 Feb 2024