या राज्यातील पोलीस वाजवणार लग्नसोहळ्यात बँड

 या राज्यातील पोलीस वाजवणार लग्नसोहळ्यात बँड

मुक्तसर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस म्हटलं की पहिल्यांदा आपल्या मनात धडकी भरते. कायदा सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे पोलीस आता सर्वसामान्यांच्या लग्न सोहळ्यात चक्क बॅंड वाजवण्याचे काम करणार आहेत. प्रत्येक राज्यातील पोलीस पथकाचे बॅंड पथकही असते. राष्ट्रीय महत्वाच्या दिनी आणि संचलना दरम्यान पोलीसांचे बॅंड पथक बॅंड वादन करते मात्र आता पंजाबमधील मुक्तसर पोलीसांनी लग्नसमारंभात बॅंड वादनाचा उपक्रम सुरू केला आहे.

पंजाबच्या श्री मुक्तसर साहिबचे पोलीस आता लोकांच्या लग्नसोहळ्यात बँड वाजवणार आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी लग्न समारंभांचे बुकिंगही सुरू केले आहे. 1 तासासाठी 7 हजार रुपये आकारले जातील. श्री मुक्तसर साहिबचे एसएसपी हरमनदीप सिंग गिल यांनी यासाठी एक परिपत्रकही जारी केले आहे.

याबाबत मुक्तसर पोलिसांच्या वतीने परिपत्रक जारी करून शहरवासियांना कळविण्यात आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, मुक्तसर पोलिस बँड घरगुती कार्यक्रमांसाठी देखील बुक केले जाऊ शकतो. परिपत्रकानुसार, कोणत्याही सरकारी किंवा खासगी व्यक्तीला पोलिस बँड बुक करता येईल.

सरकारी कर्मचाऱ्यांना एका तासाच्या बुकिंगसाठी पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. खासगी कर्मचारी आणि सर्वसामान्यांकडून एका तासासाठी सात हजार रुपये आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक अतिरिक्त तासासाठी सरकारी कर्मचाऱ्याकडून 2,500 रुपये आणि जनतेकडून 3,500 रुपये आकारले जातील.

SL/KA/SL

13 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *