मराठा समाज आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले …

 मराठा समाज आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले …

सोलापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यातील घटनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले असून रस्त्यावर उतरून मराठा समाजाची निदर्शने सुरू आहेत…

जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज पंढरपुरात प्रतिक्रिया उमटल्या. पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सरकार विरोधी घोषणा देत मराठा समाज हा आक्रमक झालेला दिसून आला. यावेळी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब देखील करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

बीड
बीड जिल्ह्यात जालना येथे झालेल्या लाठीमार संदर्भात निषेध म्हणून बंद चे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आज बंद करण्यात आले. शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आले. कार्यकर्त्याने या घटनेचा रस्त्यावर येऊन निषेध केले

उस्मानाबाद
जालना जिल्ह्यातील सराटी इथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज उस्मानाबाद येथे शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा तरुण एकत्र येऊन शहरवासीयांना दुचाकीवरून आवाहन करत असताना शहरातील नगरपालिका परिसरातील काही दुकानावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे यानंतर संपूर्ण शहरात कडेकोट बंद असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांना कोणत्याही जीवित अथवा वित्तहानी नुकसान होऊ नये अशी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने संपूर्ण बस सेवा बंद केली आहे. या आंदोलनात महिलाही रस्त्यावर उतरले असून महिलांनीही व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात सहभाग घेतल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

ML/KA/SL

2 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *