सत्तेसाठी हपालेल्या लोकांची न्यायालायाने चिरफाड केली

 सत्तेसाठी हपालेल्या लोकांची न्यायालायाने चिरफाड केली

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नसून लोकशाहीच्या भवितव्याचा आहे. सर्वोच्च न्यायलाने आजच्या निकालात सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागडं राजकारण याची पूर्णपणे चिरफाड केली आहे. राज्यपाल महोदयांची भूमिका अयोग्य होती हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचं ही वस्त्रहरण न्यायालयानं केलं आहे. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा याची मागणी आम्ही करणार आहोत, अशी प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायायाने जाहीर केल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या १० महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आजअखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने शिंदे गटाला मोठे धक्के दिले आहेत. तसेच राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. दुसरीकडे, १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची विशेष उपस्थिती होती. देशामध्ये एकूणच लोकशाहीची हत्या होते की काय अशी स्थिती असताना लोकशाहीची हत्या करू इच्छिणाऱ्यांच्या विरोधी असे सगळे देशप्रेमी पक्ष आणि जनता यांना एकत्र करण्याचे जे आमचे प्रयत्व आहेत. त्या निमित्ताने नितिश कुमार आणि तेजस्वी सहकाऱ्यांसह मातोश्रीवर उपस्थित राहीले आणि त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आला हा शुभ शकुन असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

SL/KA/SL

11 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *