श्री संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल

धाराशिव, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज धाराशिव शहरात आगमन झालं. या पालखीचं धाराशिव शहरात नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी रांगोळ्या काढून फुलांनी रस्ते सजवून मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या पालखीचं पंढरपूरकडे पायी जाण्याचं हे 54 वे वर्ष आहे.
या पालखीसोबत घोडे, भगव्या पताका घेतलेले तसंच टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत पायी जाणारे शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. धाराशिव शहरातील अनेक भाविक भक्तांनी या पालखीच्या दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती.ही पालखी आज दिवसभर धाराशिव शहराला प्रदक्षिणा घालून संध्याकाळी महिला मंडळाच्या मैदानावर विसावणार आहे .
पालखीचा आज धाराशिव शहरात मुक्काम आहे तर उद्या सकाळी ही पालखी तुळजापूरकडे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
ML/KA/PGB
19 Jun 2023