विधानसभा अध्यक्षांच्या कार्य पद्धतीवर विरोधक नाराज

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही तसेच आज विरोधकांचा सभात्याग असताना सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी थांबवून विरोधक नाहीत ही संधी साधून वादग्रस्त चिटफंड , वस्तू सेवा कर विधेयक मंजूर करून घेतली यामुळे विरोधक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराज झाले होते.
वस्तू सेवा कर या विधेयक द्वारे ऑनलाईन गेमिंग, लॉटरी, बेटिंग , ऑनलाईन कॅसिनो याला अधिकृत करण्याची मंजुरी मिळाली.
ही विधेयक तरुण पिढीसाठी धोकादायक असताना त्यावर विरोधकांना चर्चा करायची होती. पण चर्चा न करता ही विधेयक मंजूर केल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांच्या दालनात त्यांना भेटून विरोधकांनी ही नाराजी व्यक्त केली.
ML/KA/SL
8 Dec. 2023