आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी केला सभात्याग

 आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी केला सभात्याग

नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा आणि गडचिरोली जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या गरोदर स्त्री रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधी सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभात्याग केला. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुलडाणा प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत चौकशीची घोषणा केली होती.

हा प्रश्न वर्षा गायकवाड, सुभाष धोटे यांनी उपस्थित केला होता, नाना पटोले, योगेश सागर , संजय गायकवाड आदींनी यावर उपप्रश्न विचारले होते.बुलडाणा आणि गडचिरोली प्रकरणी डॉक्टरांचा दोष नाही असं मंत्री म्हणाले होते. मात्र सत्तारूढ सदस्य आधी यावर आक्रमक झाले होते मग विरोधी सदस्यांनी आक्रमक होत मंत्र्यांचा राजीनामा मागत सभात्याग केला.

रक्तपेढ्यासाठी अलिकॉट यंत्र

राज्यातील सर्व सरकारी ३१ रक्तपेढ्या मध्ये येत्या महिनाभरात अलिकॉट यंत्र उपलब्ध करून दिली जातील अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात केली , हा मूळ प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

हे यंत्र लहान मुलांना रक्त देण्यासाठी लागणाऱ्या रक्त पिशव्या तयार करण्यासाठी आवश्यक असते. सर्व खासगी रक्तपेढ्यानाही हे यंत्र उपलब्ध करून देण्याची सक्ती केली जाईल असं ही मंत्री म्हणाले. भास्कर जाधव , योगेश कदम , प्रणिती शिंदे यांनी उप प्रश्न विचारले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात ही यंत्रे उपलब्ध करून दिली जातील असं मंत्री म्हणाले.

ज्या ठिकाणी सरकारी पतपेढ्या उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी प्रस्ताव आल्यास दोन महिन्यात मंजुरी दिली जाईल असं सावंत यांनी सांगितले.

ML/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *