शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे यापुढे बंद

 शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे यापुढे बंद

सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असतो . हे विद्यार्थी घडवण्याचे कार्य शिक्षकांना मोकळेपणाने पूर्णवेळ करता यावे यासाठी शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे ठराविक वगळता यापुढे देण्यात येणार नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

मुख्यमंत्री सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते . शिक्षकांनी ज्या मागण्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत त्या सर्वांचा विचार आमचे सरकार नक्कीच करेल .

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचाही विचार विनिमय केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली .

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या या 17 व्या अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.The non-teaching jobs given to the teachers are henceforth closed
ML/KA/PGB
16 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *