अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर

 अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन महिला अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना यावर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. महिलांचे कार्य आणि बाजारपेठेतील त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. समितीने गोल्डिन यांचे श्रम बाजारातील संशोधन उत्कृष्ट मानले. त्यांच्या संशोधनातून श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील भेदभाव आणि त्यांच्या कमाईची माहिती देण्यात आली आहे.

गोल्डिन यांनी 200 वर्षांच्या डेटाचा अभ्यास करून आपला अहवाल तयार केला होता. यामध्ये त्यांनी लिंगाचा रोजगार आणि कमाईवर काय परिणाम होतो हे सांगितले.

  • गोल्डिन यांच्या संशोनातून समोर आलेले प्रमुख निष्कर्ष
  • गोल्डिन यांच्या संशोधनानुसार, बाजारपेठेत महिलांच्या योगदानात थेट वाढ झाली नाही. त्याऐवजी, सुरुवातीच्या टप्प्यात ते कमी झाले आणि आता वाढत आहे.
  • समाज जसजसा शेतीकडून उद्योगाकडे वळत गेला तसतसे विवाहित महिलांचे बाजारपेठेतील योगदान कमी होत गेले.
  • गोल्डिन यांच्या अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की 20 व्या शतकात महिलांनी पुरुषांपेक्षा चांगले शिक्षण घेतले आहे.
  • जगभरातील अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण होऊनही महिलांची कमाई पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. स्त्रिया ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्याचा त्यांच्या कमाईवरही खोलवर परिणाम होतो.

अर्थशास्त्र या विषयात नोबेल पुरस्कार मिळणारे अमर्त्य सेन हे एकमेव भारतीय आहेत. त्यांना 1998 मध्ये हा सन्मान मिळाला होता. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांतातील योगदानासाठी त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

SL/KA/SL

9 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *