ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त आशुतोष ठोंबरे यांनी पदभार स्वीकारला

ठाणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून आज आशुतोष डुंबरे यांनी सूत्रे हातात घेतली. मावळते पोलीस आयुक्त जयजयतसिंग यांची बदली झाल्यानंतर 11 डिसेंबर रोजी आशुतोष डोंगरे यांची ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून घोषणा झाली होती. आज त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हातात घेत असताना एका पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला.
सहा वर्षांपूर्वी आशुतोष डुंबरे यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून यापूर्वी काम पाहिले होते. आता पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याने आपली जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचेच असल्याने आपल्यावर अधिक जबाबदारी आहे असे ते म्हणाले. सध्या महिला आणि अल्पवयीन मुलीं बाबतच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना केली जाईल असे त्यांनी सांगितले.
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याने अशी प्रकरणे लवकरच निकाली काढली जातील असे त्यांनी सांगितले. यासोबतच सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांचे गुन्हे सुद्धा वाढत असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच त्यावर कठोर पावले उचलले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे आपल्याही निदर्शनास आले असून त्यावर काहीतरी उपाययोजना लवकरच केली जाईल आणि सर्वांच्या सहमतीने आणि सहाय्याने त्यावर उपाययोजना करू असे ते म्हणाले.
ML/KA/SL
21 Dec. 2023