येथे होणार MPSC चे नवे कार्यालय
मुंबई,दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईमधील बेलापूर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन कार्यालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बेलापूर येथे नवीन कार्यालयीन इमारतीच्या उभारणीस राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी तब्बल 282 कोटी 2१5 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने बेलापूर येथे ४७५७.४४ चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे.
इमारत बांधकामासाठी 2019 मध्ये 97 कोटी 47 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. मात्र आता चटई क्षेत्र निर्देशांक आणि बांधकाम क्षेत्रफळ मोजमापाच्या नियमांत झालेल्या बदलामुळे या अधिकच्या खर्चास आता मान्यता देण्यात आली आहे.
The new office of MPSC will be here
SL/KA/SL
11 Nov. 2022