आता Gen Z नाही तर Generation Beta म्हणा, २०२५ पासून जन्माला आलेल्या जनरेशनला नवीन नाव

आजपासून जन्माला येणाऱ्या या नव्या पिढीचे नाव आहे ‘जनरेशन बीटा’ असेल. 1 जानेवारी 2025 पासून जन्मलेल्या मुलांना ‘जनरेशन बीटा’ असं नाव देण्यात आले आहे. साधारणपणे कोणत्याही पिढीचं नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. आतापर्यंत तुम्ही Millennials आणि Gen Z सारख्या शब्दांबद्दल रिल्स, काही लोकांच्या बोलण्यातून ऐकले असेल. आपल्या पिढीने जगातील तंत्रज्ञान विकसित होताना, वापरताना पाहिले आहे. यानंतर Gen Z आणि जेन अल्फा या पिढ्या आल्या. त्या अजून लहान आहेत. शाळेत शिकत आहेत. परंतू, आता काळ एआयचा येऊ घातलेला आहे. या काळात जन्माला येणाऱ्या पिढीला बीटा म्हणून ओळखले जाणार आहे.