तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित

हैदराबाद, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित झाला आहे. तेलंगणा राज्य काँग्रेस प्रमुख रेवंथ रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री असतील. 7 डिसेंबरला गुरुवारी ते पदाची शपथ घेतील. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता येण्यामध्ये रेवंथ रेड्डी यांचे महत्त्वाचे योगदान होते.
केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, रेड्डी अनुभवी आहेत. लोकांसोबत काम केलं आहे. तसेच तेलंगणाच्या लोकांना त्यांनी आश्वासन दिली आहेत. त्यांना काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून घोषित करत आहे.
रेवंत रेड्डी हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता. २०१४ सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर २०१७मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसची वाट धरली. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना २०२१मध्ये प्रदेशाध्यक्ष केले.
SL/KA/SL
5 Dec. 2023