प्रजासत्ताकदिनी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित “छत्रपती संभाजी’ चित्रपट

 प्रजासत्ताकदिनी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित “छत्रपती संभाजी’ चित्रपट

पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित बरेच चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रदर्शनावर आधारित छत्रपती संभाजी सिनेमा रखडला होता. पण आता छत्रपती संभाजी सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे. शशांक उदापूरकर छत्रपती संभाजींची भूमिका साकारत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे बलिदान भूमी वडू बुद्रुक, पुणे येथे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले.

अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.

प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात दिसणार आहेत.’छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

SL/KA/SL

12 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *