ऐतखाऊ मुलांविरोधात आईने घेतली कोर्टात धाव

 ऐतखाऊ मुलांविरोधात आईने घेतली कोर्टात धाव

पाविया,इटली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चाळीशी पार करूनही कोणताही कामधंदा न करता ऐतखाऊपणा करणाऱ्या आणि वर मनस्ताप देणाऱ्या मुलांविरुद्ध आईनं कोर्टात धाव घेतली आहे. ही घटना आहे, इटलीच्या पाविया शहरातील. येथे एक ७५ वर्षीय महिला दोन मुलांसोबत राहते. या मुलांचं वय ४० आणि ४२ वर्षे आहे. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून तिचं घर पतीच्या पेन्शनवर चालतं. पतीच्या मृत्यूनंतर ती घरचा सगळा खर्च आणि मुलांचा खर्च पतीच्या पेन्शनमधूनच करत होती. मात्र तिची मुले कोणताही कामधंदा करत नाहीत. त्यामुळे तिने वैतागुन न्यायालयात धाव घेतली. हा खटला तिनं जिंकलाही.

सीएनएनच्या वृत्तानुसार, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तिनं आपल्या मुलांचा उल्लेख ‘परजीवी’ असा केला आहे. ही दोन्ही मुलं खाऊन-पिऊन घरी लोळत पडतात. अजिबात काम करत नाहीत. महिला अक्षरश: या दोन्ही मुलांना विटली होती. महिलेची ही करुण कहाणी ऐकल्यानंतर न्यायाधीश सिमोना केटरबी यांनी तिच्या बाजूनं निकाल दिला. तसंच, दोन्ही मुलांना १८ डिसेंबरपर्यंत घर सोडण्याचे आदेश दिले.

परदेशांमध्ये १६ वर्षीच मुलं घराबाहेर पडुन स्वावलंबी होतात. या आपल्याकडे सार्वत्रिक समज आहे. मात्र इटलीतील हा ऐतखाऊ महाभागांनी आईला त्रस्त करून आपल्या या समजाला छेद दिला आहे.

SL/KA/SL

28 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *