12 हजार रु कि. -जगातील सर्वांत महागडा तांदुळ
टोकीयो, दि. ८ : जपानमधील कोशिहिकारी प्रदेशात एक वैशिष्ट्यपूर्ण तांदूळ पिकवला जातो. याची किंमत प्रति किलो 12 हजार 500 रूपये आहे. त्याचे नाव किनमेमाई प्रीमियम असे आहे. या ठिकाणची विशिष्ट माती आणि हवामान या तांदळाच्या उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. या तांदळाचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात होते. त्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड आहे, ज्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. जपान हा तांदूळ जगाला पुरवतो. शिवाय उत्पादन कमी असल्याने आपोआप त्याची किंमतही जास्त आहे.
किनमेमाई प्रीमियम तांदळाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी तो एका विशेष प्रक्रियेतून जातो. त्याची निवड हाताने केली जाते आणि त्याची पृष्ठभागावरील स्टार्च आणि कोंडा काढून टाकण्यासाठी विशेष प्रक्रिया केली जाते. यामुळे हा तांदूळ शिजवण्यापूर्वी धुण्याची गरज नसते. शिवाय तो आरोग्यासाठी ही चांगला समजला जातो. त्यातून अनेक पौष्टीक गोष्टी शरिराला मिळतात. तसा हा तांदूळ दुर्मीळ म्हणावा लागेल.
या तांदळात लिपोपॉलीसेकेराइड्स (एलपीएस) नावाचे खास मिश्रण असते. एलपीएस रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत करण्यास मदत करते आणि अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण करते, असा दावा केला जातो.
SL/ML/SL