मुंबईतील सर्वांत महागडा जमिन विक्री व्यवहार, या कंपनीने केली खरेदी

 मुंबईतील सर्वांत महागडा जमिन विक्री व्यवहार, या कंपनीने केली खरेदी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईमध्ये जमिनीच्या इंचाइंचाला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे असे म्हणतात. येथील धनिकांचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड व्यवहार सर्वसामान्यांना अचंबित करतात. आता मुंबईमध्ये आजवरचा सर्वांत महागडा मानला जाणारा जमिन व्यवहार होत असल्याची माहिती समोर येत आहे. हा व्यवहार तब्बल 5200 कोटी रुपयांमध्ये होत आहे.मुंबईोतील वरळीमध्ये ही जबरदस्त डील झाली आहे. येथील बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मुख्यालय (Bombay Dyeing HeadQuarter) विक्री होत आहे. वरळीच (Worli) नाही तर दक्षिण मुंबईतील हा सर्वात महागडा सौदा ठरला आहे. इतक्या हजार कोटींची बोली ऐकून अनेक दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जपानमधील गोईसू रिअल्टीने ही हॉट डील केली आहे.

मुंबईतील वरळी परिसरात बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मुख्यालय आहे. जवळपास 22 एकरच्या भूभागासाठी मालमत्ता करार (Land Deal)झाला. बॉम्बे डाईंग दोन टप्प्यात ही डील पूर्ण करणार आहे. ही डील 5200 कोटी रुपयांमध्ये होत आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीला गोईसू रियल्टीकडून 4,675 कोटी रुपये मिळतील. तर दुसऱ्या टप्प्यात बॉम्बे डाईंगला 525 कोटी रुपये अटी आणि शर्तीं पूर्ण (14 September 2023) झाल्यावर मिळतील.

सध्या बॉम्बे डाईंगच्या या मुख्यालयावर वाडिया इंटरनॅशनल सेंटर आहे. गेल्या आठवड्यात मुख्यालयातील वस्तू दुसरीकडे नेण्यात आल्या. त्यासाठी मोठ्या वाहनांचा वापर करण्यात आला. आता मुख्यालय पूर्णपणे रिकामे झाले आहे. तर चेअरमन नुस्ली वाडिया यांचे कार्यालय दादर-नेगॉम या त्यांच्याच मालकीच्या कार्यालयात नेण्यात आले. ही इमारत सध्याच्या इमारतीच्या मागील बाजूस आहे.

SL/KA/SL

14 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *